बाेरी काॅलनीत मेमून मंंजिल ही चार मजली इमारत अाहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या कपासी कुटुंबाच्या ३०६ क्रमांकाच्या खाेलीला पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अाग लागली. अागीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ बंब घटनास्थळी दाखल झाले. अागीने राैद्ररूप धारण केल्यामुळे कुणालाच घराबाहेर पडता अाले नाही. यात दाऊद अली कपासी (८०), तस्लिम अपासी कपासी (४२), सकिना अपासी कपासी (१४) अाणि माेहीन अपासी कपासी (१०) यांचा हाेरपळून मृत्यू झाला.मुंबईतीलल्या लाेअर परळ भागातील ‘वन अबव्ह’ पबला अाग लागून चार दिवस उलटत नाही ताेच गुरुवारी अंधेरीच्या मराेळ भागात असलेल्या मेमून मंजिल या चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या अागीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा हाेरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews